कोको गॉफला विजेतेपद   

पॅरीस : अमेरिकेची कोको गॉफ फ्रेंच ओपनची नवी विजेती ठरली आहे. अंतिम लढतीत जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असणार्‍या सबालेंकावर सनसनाटी मात करत कोको गॉफने फ्रेंच ओपन स्पर्धेत बाजी मारली. 
 
पहिला सेट गमावल्यानंतरही गॉफने विजेतेपदावर मोहोर उमटवली. गॉफचं आजवरचं हे दुसरं ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे. अमेरिकन टेनिसस्टार कोको गॉफनं यंदाच्या फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेत महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं. २१ वर्षांच्या गॉफनं अंतिम सामन्यात जगातली सध्याची नंबर वन टेनिसपटू आर्यना सबालेंकाला पराभवाचा धक्का देत पहिल्यांदाच फ्रेंच ओपन जेतेपदावर आपलं नाव कोरलं. 
 
तिनं पहिला सेट गमावल्यानंतरही हा सामना ६-७, ६-२, ६-४ अशा फरकानं जिंकला. २०१५ साली सेरेना विल्यम्सनंतर फ्रेंच ओपन जिंकणारी गॉफ ही ही पहिलीच अमेरिकन टेनिसपटू ठरली. दरम्यान गॉफचं आजवरचं हे दुसरं ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे. याआधी तिनं २०२३ मध्ये वयाच्या अवघ्या एकोणिसाव्या वर्षी अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली होती.
 

Related Articles